Saturday, February 15, 2025
HomeUncategorized*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व आविसं सरसेनापती नंदू नरोटे यांच्या पाठपुराव्यामुळे लॅायड्सने...

*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व आविसं सरसेनापती नंदू नरोटे यांच्या पाठपुराव्यामुळे लॅायड्सने कंपनीने सुरू केली स्कूल बस!!*

*“ट्रक वाहतुकीमुळे होत होता एसटी बसेसला विलंब”*

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील लगाम ते आलापल्ली पर्यंतचा रस्ता लॅायड्स मेटल्स कंपनीच्या ट्रकमुळे खराब झाल्याने एसटीच्या बसगाड्या उशिराने पोहोचत होत्या.त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत होता.आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि आविस सरसेनापती नंदूभाऊ नरोटे यांनी यासंदर्भात एसटी महामंडळाकडे पाठपुरवा शिवाय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या मार्गावरील लोहखनिज वाहतुक बंद करण्याची मागणी करत बोरी येते परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले होते.त्याची दखल घेत अखेर लॅायड मेटल्स कंपनीने विद्यार्थ्यांसाठी स्कूल बस सुरू केली आहे.कंपनीच्या लोहदगडाच्या वाहतुकीमुळे लगाम ते आलापल्ली पर्यंतचा रस्ता पूर्णपणे खराब झाला.त्याामुळे वारंवार वाहतूक खोळंबली जाऊन या मार्गावर एसटी बसेस वेळेवर धावत नव्हत्या.यासंदर्भात माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व आविसं सरसेनापती नंदूभाऊ नरोटे यांनी अहेरी आगार व्यवस्थापक आणि गडचिरोली विभाग नियंत्रकांशी चर्चा केली होती.त्यांनी ट्रक वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या ट्राफिक जाम मुळे आणि खराब रस्त्यामुळे एसटी बस वेळेवर पोहोचू शकत नसल्याचे सांगितले होते.त्यामुळे अजयभाऊ कंकडालवार व नंदूभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वात ट्रक वाहतूक रोखण्यासाठी आंदोलन करण्यात आले.शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घेऊन लॅायड मेटल कंपनीने सर्व गावातील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्कूल बसेसचा नियमित लाभ द्यावा.अशी अपेक्षा कंकडालवार व नरोटे यांनी व्यक्त केली आहे. तसेच ट्रक वाहतुकीमुळे इतर वाहनधारकांना त्रास होणार नाही यासाठीही योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज