*किष्टापूर (वेल) ग्रा.पं.पदाधिकाऱ्यांनी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!!*
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील किष्टापुर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नवगोच ते तनबोडी या रस्त्याचे याच महिन्यात शासकीय निधीतून डांबरीकरणाचे काम करण्यात आले.सदर रस्त्याचे बांधकामही पूर्ण झालेला आहे.परंतु या रस्त्याचे रुंदीकरनाचे काम लॉयड मेटल कंपनीकडून करण्यात येत असून या कामासाठी संबंधित कंपनीने ग्रामपंचायतीची कोणत्याही पूर्व परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र न घेता करीत असल्याने सदर रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम हे अवैध व नियमबाह्य असल्याने सदर काम तात्काळ थांबविण्याची मागणी येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी केली आहे.किष्टापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात लॉयड मेटल कंपनीकडून सुरू असलेल्या लोह खनिज वाहतुकीमुळे परिसरातील नागरिकांना आरोग्य समस्या उद्भवत असून पर्यावरणाची ऱ्हास होत आहे.सर्वसामान्य नागरिकांसह शालेय विध्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या जडवाहनामुळे परिसरातील शेतकऱ्यांची शेतीची दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.असे अनेक समस्यांची निवेदनात नमूद असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित निवेदनाची दखल घेऊन वरील नियमबाह्य रस्त्याचे रुंदीकरणाचे काम तात्काळ थांबविण्याण्याची मागणी केली आहे.