Saturday, February 15, 2025
HomeUncategorizedसूरजागड वाहतुकीमुळे शालेय बस उशीरा होत आहे:महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ"गडचिरोली विभाग...

सूरजागड वाहतुकीमुळे शालेय बस उशीरा होत आहे:महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ”गडचिरोली विभाग अहेरी आगारकडून माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना पत्रद्वारे माहिती!!*

अहेरी : दिनांक १५-०७-२०२३ रोजी १२.३० वाजताची नागेपल्ली-लगाम शालेय बस फेरी उशीरा झाला होता त्यामुळे
दिनांक १५-०७-२०२३ रोजी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरी आगारात जावून आगार प्रमुखाशी चर्चा केली असतात आगारातून १०-३० वाजता अहेरी-आल्लापल्ली-तानबोडी-बोरी फेरी वेळेवर अहेरी येथून सुटली व आल्लापल्ली येथून विद्यार्थ्यांना नेऊन बोरी पर्यंत पोचवून
परत येताना सुरजागड मालवाहतूक ट्रकची खूप मोठी रांग लागली होती आणि विरुध्द दिशेने सुध्दा सतत वाहतुक सुरू असल्याने आणि पावसाळ्यामुळे रोडचे खाली उतरणे शक्य नसल्याने बसचे चालक ट्रकचे मागे-मागे नागेपल्ली पर्यंत आल्याने सदर शालेय बस १२-३० वाजता ऐवजी १४-३० वाजता पोहोचली.यामुळे नागेपल्ली-लगाम शालेय फेरी उशीरा गेली.आलपाल्ली ते लगाम मार्ग अत्यंत खराब असल्याने आणि त्या मार्गावर खनिज वाहतुकीचे अत्यधिक वाहतुक असल्याने बसेस वेळेवर पोचण्यास विलंब होत आहे.सुरजागडचे खनिज वाहतुकीमुळे भविष्यात सुध्दा वेळेनुसार बसेस पोचणे अडचणीचे असल्यास माहितीस पत्र देण्यात आली असल्याने समोराही शालेय बस फेरी उशीरा होऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होणार आहे.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज