सूरजागड लोहप्रकल्पातील वाहतुकीमुळे होणाऱ्या त्रासाच्या निराकरण करावे

शिष्टमंडळानी जिल्हाधिकारी यांची भेट घेवुन निवेदन दिले.

आलापल्ली : आष्टी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३(C) या मार्गाने सुरजागड लोहखनिज वाहतुक करणाऱ्या जड वाहनांमूळे अनेक निरअपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणी अनेक नागरिक अपंगत्व तसेच जखमी सुद्धा झाले आहेत. त्याचप्रमाणे आलापल्ली ते आष्टी या मार्गावरील अनेक गांवे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असून लोहखनीज वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या धुळीमुळे गावातील व या मार्गाने ये-जा करण्याऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.तसेच विद्यार्थ्यांचे सन २०२३-२४ या वर्षाचे शैक्षणिक सत्र सुरू झाले असून लगाम,बोरी तसेच राजपूर पॅच व इतर अन्य गावातील विद्यार्थांना नियमीतपणे शिक्षण घेण्यासाठी आलापल्ली व अहेरी येथील शाळेत ये-जा करावे लागते.मात्र सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांमूळे आलापली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहेत त्यातच या मार्गावर नेहमीच हजारो अवजड वाहनांची रेलचेल सुरू असते.त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना व अन्य नागरिकांना अपघाताची भीती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.सध्या पावसाळा सुरु असल्याने लोहखनीज वाहतूक करणारे वाहन रस्त्यावर फसून असल्याने वाहनांची खूप मोठी रांग निर्माण होऊन या मार्गावरील वाहतूक ठप्प होत असल्याने विद्यार्थ्यांना व अन्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.त्यामुळे विद्यार्थी सुद्धा शाळेच्या वेळेनुसार पोहचू शकत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. त्याचप्रमाणे अहेरी तालुक्यातील मद्दीगुडम येथील लोहखनीज साठवणूक डंपींग यार्ड हे त्या गावातील नागरिकांना आणि त्या गावावरून ये-जा करणाऱ्या नागरिकासाठी शापच असल्याचे बोलले जात आहे. कारण लोहखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या धुळीमूळे तसेच रस्त्यावर होणाऱ्या चिखलामुळे अनेक दुचाकी वाहन धारक यांचा तोल जाऊन अपघात होत आहे.त्यामुळे मद्दीगुडम येथिल डंपिंग यार्ड लोहखनीज साठवणूक बंद करण्यात यावे.अश्या प्रकारची मागणी येथील नागरिकांची आहे.तसेच मद्दीगुडम येथील वनविभागाच्या जागेवर अनेक लोहखनीज वाहतूक करणारे वाहने मोठ्या प्रमाणात उभी करण्यात येत आहे. सदर वाहनावर बंदी घालण्यात यावे,तसेच मद्दीगुड्म येथील डंपिंग यार्ड ला नियमाचे उल्लंघन करून मंजूरी देण्यात आलेली आहे त्यामुळे मंजूरी देणाऱ्या अधिकाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.आलापली ते आष्टी मार्गावरील लोहखनीज वाहतूक बंद करण्यात यावे कारण या मार्गांनी वाहतूक करणाऱ्या अनेक निरअपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे काही लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आलेले आहे.आणि मोठ्या प्रमाणात सदर मार्गाने ये-जा करणारे नागरिक अपघातामध्ये जखमी झाले आहेत.त्या निरपराध मृत पावल्या लोकांच्या कुटुंबातील व्यक्तींना ५० लाख रुपये व अपंगत्व आलेल्याना १५ लाख रुपये तसेच जखमी झालेल्या व्यक्तींना ५ लाख रूपयांची मदत देण्यात यावी.तसेच ज्या वाहनामुळे व वाहनचालकांमुळे अपघात झाला आहे. त्या वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावे.तसेच ज्याप्रमाणे जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार आलापल्ली ते सिरोंचा मार्गाचे काम चालू असल्यामुळे त्यानी अवजड वाहने या मार्गाने वाहतूक करण्यासाठी बंदी घातली आहे.त्याचप्रमाणे आलापली ते आष्टी मार्गावरील जड वाहनांना सुद्धा बंदी घालण्यात यावे.तसेच सूरजागड पहाड़ीकडे जाणाऱ्या जंगलातून नवीन रस्त्याच्या बांधकाम होत आहे परंतु या रस्त्याच्या बांधकामासाठी कोणत्याही प्रकाराची मंजूरी न घेता रस्ता तयार करण्यात येत आहे.त्यांची चौकशी करून करवाई करण्यात यावी,व वेलगुर टोला ते वडलापेठ रस्त्याची रुंदीकरण करून रस्ता तयार करण्यात येत आहे.रस्त्याच्या बाजूला लोकांची वस्ती व शाळा आहेत तसेच ग्राम पंचायत किंवा व ग्राम सभेकडून कोणत्याही प्रकारची नाहरकत प्रमाणपत्र न घेता सदर काम करत आहेत त्यामुळे ते मंजूर असलेला काम रद्द करण्यात यावी.तसेच अहेरी ते आलापल्ली,अहेरी ते सुभाषनगर,अहेरी ते खमनचेरू आणि अहेरी ते आवलमरी या रस्त्यांच्या बांधकामांना मंजूरी देऊन सदर सर्व रस्ते बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. वरील सर्व मुद्दे लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी आदिवासी विध्यार्थी संघटना व अजयभाऊ मित्र परिवार तसेच त्रस्त नागरिक यांच्यातर्फे आदिवासी विध्यार्थी संघाचे सरसेनापती नंदूभाऊ नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती अहेरी येथील सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात बोरी येथील मुख्य चौकात दिनांक ११ जुलै रोजी भव्य चक्का जमा आंदोलन करण्यात आले.या दरम्यान मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी दूरध्वनीद्वारे शिष्टमंडळास तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे बोलावून सबंधीत विभागास बोलावून बैठक घेऊन अधिकारी व शिस्टमंडळाशी चर्चा करून समस्याचे निराकरण लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन दिले.

शिष्टमंडळात आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे सरसेनापती नंदुभाऊ नरोटे,आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयदादा कंकडलावार,जेष्ट नेते मोहणभाऊ पुराम,सरपंच धणीराम हिडामी,सरपंच ललीणा पुराम,राजपूर पॅच ग्रामपंचायत भाजपाचे पदाधिकारी सुरेश गंगाधारीवार,मधुकर मडावी,कालीदास कुसनाकेसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील शिष्ट मंडळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here